कोपरगांव रोटरी क्लबच्यावतीने उस तोडणी कामगार महिलांना भाऊबीजेनिमीत्त साडी, मिठाईचे वाटप 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या महिलांना भाऊबीजेनिमीत्त रोटरी व रोटरॅक्ट क्लब कोपरगांवच्या सहकार्याने कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते साडी व मिठाईचे वाटप करण्यांत आले. अध्यक्षस्थानी संजीवनी फाउंडेशनचे सचिव व रोटरी क्लबचे सदस्य सुमित  कोल्हे होते. 

         प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष वीरेश अग्रवाल प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वंचितांचे अश्रु पुसून त्यांच्या जीवनांत ख-या अर्थाने आनंद निर्माण करण्यासाठी अवितरत संघर्ष केला. रोटरी क्लबही विविध कामातुन सामाजिक उपक्रम राबवित आहे. सचिव राकेश काळे म्हणाले की, शेकडो मैल दुर घरदार सोडुन उसतोडणी कामगार तांडयावर येतात त्यांच्या माता भगिनींना दिवाळसणाचा भाऊबीजेचा आनंद घेता यासाठी यासाठी रोटरी क्लब कोपरगांवने या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

  कोल्हे पुढे म्हणाले की, जगभरातील ९० हजार केंद्राच्यापुढे रोटरी क्लबचे कार्य सुरू असून प्रत्येक संकटातील सामाजिक सेवा ही वाखाणण्याजोगी आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कारखान्यांच्या स्थापनेपासुन आजपर्यंत उस तोडणी कामगार, महिला भगिनी व त्यांच्या मुला मुलींच्या सुख-दुःखाची काळजी घेवुन सातत्याने मदत केलेली आहे, तोच वसा आपण पुढे चालवत आहोत.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर चालू गळीत हंगामात विविध जिल्हयातील २५ ठिकाणाहून उस तोडणी कामगार आलेले आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, निवासाची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र, मुलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या असून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उसतोडणी कामगारांचा प्रत्येकी तीन लाख रूपयांचा अपघाती विमा तसेच पशुधनाचाही विमा उतरविलेला आहे. उसतोडणी कामगारासह लहान मुलांची आरोग्य तपासणीही करण्यांत येते.

          याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन. वल्टे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोहित वाघ, उपाध्यक्ष कुणाल आभाळे, रिंकेश नरोडे, विशाल आढाव, विक्रम लोढा, रोहन कासलीवाल, जीवन भंडारे, अमर नरोडे, गौरव भुजबळ, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कोपरगांव रोटरी क्लबचे सर्व सदस्य, उस तोडणी महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित सुत्रसंचलन व आभार डॉ. मालकर सर यांनी केले.