दीनदयाळ उपाध्याय जयंती व मन की बातचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव मंडळ भाजपाच्या वतीने आज आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे , शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे , संघटन सरचिटणीस भीमराज सागडे, शहराध्यक्ष  रवींद्र सुरवसे, भाजपा कार्यालय प्रमुख कैलास सोनवणे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, दिगंबर काथवटे, प्रा. अरुण धस, केशव आंधळे, संजय खेडकर,  मच्छिंद्र बर्वे, अमोल माने, संतोष कंगणकर, विक्रम बारवकर,  रामकिसन महाराज तापडिया, अजय डमाळ, काकासाहेब हरदास आदीनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे  प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनगौरव देशासमोर ठेवला तसेच इंडियन शाईन लँग्वेज, योगाभ्यासचा उपयोग, प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी देशवासीयांना दसरा व दिवाळीच्या शुभेच्छा देत स्थानिक वस्तू वापरा, लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा असे अवाहन करत स्वदेशीचा नारा दिला.