शिक्षण क्षेत्रात डॉ.गायकवाड यांचे मोलाचे योगदान – बिपीन कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : ग्रामीण भागात राहून मुलांचं भवितव्य घडवणाऱ्या शिक्षण संस्था उभ्या करणं हा ध्यास माजीमंत्री, स्व. शंकरराव कोल्हे यांनी ठेवत त्याप्र‌माणे दूरदृ‌ष्टी ठेऊन कार्य केलं आणि त्याच्या परिपूर्तीसाठी शिक्षकांनी साथ दिली त्यात डॉ. गोरखनाथ गायकवाड यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

Mypage

संजीवनी सैनिकी स्कूलचे प्राचार्य डॉ. गोरखनाथ गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा ब्रम्हकुमारी राजयोगीनी ध्यान केंद्र कोपरगाव येथे रविवारी पार पडला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी राजयोगीनी ब्रम्हकुमारी सरला दिदी म्हणाल्या की, ज्या विधात्यांने आपल्याला पृथ्वीतलावर पाठवले याची आठवण ठेऊन आत्मा हाच ईश्वर आहे हे समजून काम करावे. जगात १८० देशात ९ हजार सेवा कें‌द्रामार्फत प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय कार्य अव्याहतपणे सुरु आहे त्या सेवामार्गातील धागा डॉ. गोरखनाथ गायकवाड आहे.

tml> Mypage

आमदार आशुतोष काळे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत पिढी घडविण्यांचे कार्य केले. त्याचा वसा डॉ. गोरखनाथ गायकवाड यांनी घेतला नौकरीत असंख्य शिक्षण पदव्या मिळविल्या त्यांचे ज्ञान सेवानिवृत्तीनंतरही समाजातील सर्व घटकांना मिळत राहो.

Mypage

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, आयुष्यात शिस्त महत्वाची आहे, ती प्रत्येकाने आत्मसात करावी. कोपरगाव सारख्या ठिकाणी ब्रम्हकुमारी सरलादिदी यांनी ४० वर्षापासून संस्कार देण्यांचे काम यामाध्यमांतून सुरू ठेवले. आपण कितीही मोठे झालो तरी शेवटपर्यंत विद्यार्थी होऊनच ज्ञान आत्मसात करावे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जीवनाची साधना सर्वसामान्यांच्या उन्नतीत मानली आणि त्यानुरूप कार्य करत हजारों विध्यार्थ्यांना बालवाडी पासून पदव्युत्तर पर्यंत एकाच छताखाली शिक्षण देणारी संजीवनी तुमच्या आमच्यात निर्माण केली.

Mypage

आजवरच्या सामाजिक सेवा कार्याचे ऋण म्हणून डॉ. गोरखनाथ गायकवाड यांनी ब्रम्हकुमारी प्रजापती ईश्वरीय कार्यास एक लाख रुपयांची देणगी धनादेशाद्वारे सरलादिदी यांना सुपुर्द केली.

सत्कारास उत्तर देताना डॉ.गोरखानाथ गायकवाड म्हणाले की, विश्वनिर्मात्याची नाळ प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची असते जीवनात गरीबी पाहिली, माझे माता-पिता निरक्षर होते. पण, त्यांनी मला घडविण्यांसाठी ज्या यातना सहन केल्या त्याची कुठेतरी उत्तराई व्हावी म्हणून संजीवनी सैनिकी स्कूलच्या प्राचार्य पदापर्यंत काम करू शकलो. या कामात ज्या ज्ञात अज्ञात बांधवांनी मोलाची साथ दिली त्यांचा आपण ऋणी आहोत.

Mypage

याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सुमीत कोल्हे, डॉ.विलास आचारी, डॉ. दीपक नाईकवाडे, संदिप कराळे, अंबादास अंत्रे, बाळासाहेब, वानखेडे, परदेशी सर, अंजली गायकवाड आदिची भाषणे झाली. या कार्यक्रमाला कोपरगाव ज्येष्ठ नागरीक मंचाचे योगतज्ञ उत्तम शहा, विजय बंब, डॉ.कोठारी, कैलास ठोळे, विधीज्ञ अशोक टुपके, सुभाष थोरात, वाल्मीक भास्कर,

Mypage

स्वप्नील निखाडे, मंदार पहाडे, विधीज्ञ मच्छिंद्र वक्ते, सुधाभाभी ठोळे, निता दिदी, निलीमा दिदी, शिवराम उगले, चार्टर्ड अकाउंटंट खेमनर सर, डॉ. दत्तात्रय मुळे, सुरेश कोल्हे, यांच्यासह विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शेवटी सूर्यवंशी यांनी आभार मानले सूत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. दर्शिका आणि सिध्दीका यांनी भारतनृत्य सादर केले.

Mypage