स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत गुटख्यासह ५.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव शहरातील टाकळी नाका येवला रोड परिसरात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करुन तिघा गुटखा विक्रेत्यासह अंदाजे ५ लाख ९२ हजार ६७८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करत धडक कारवाई केल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Mypage

या घटनेची अधिक माहिती अशी की, अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने राहता शिर्डी व कोपरगाव परिसरात पहाटे गस्त घालण्यासाठी व अवैद्य व्यवसायीकांना आळा घालण्यासाठी विशेष पथके पाठवण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहीतीच्या अधारे कोपरगाव शहरातील येवला रोड टाकळी नाका परिसरात एक मारुती व ओमनी गाडीतुन गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कटके यांनी सुचना दिल्या.

tml> Mypage

स्थानिक कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व राम खारतोडे यांच्या मदतीने सापळा रचुन टाकळी नाका येवला रोड परिसरात एक ओमनी व मारुती कार गुटखा घेवून आल्याचे दिसताच पोलीसांनी धरपकड सुरु केली असता त्यांना वसिम चाॅंदभाई चोपदार रा. गांधीनगर, राजमल मिश्रीलाल बोथरा रा. निवारा व अर्जुन लक्ष्मण शेळके रा. कोळपेवाडी हे गुटख्याच्या पोत्यासह मिळून आले.

Mypage

त्यांच्याजवळ २ लाख ८२ हजार ६७८ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आदी पदार्थांच्या पुढ्यांचे पोते मिळुन आले. दिड लाखाची ओमीनी गाडी एम. एच. १४ डी. एम. ५७०२ व १ लाख ६० हजाराची  मारुती गाडी –  एम एच ०४ सी जे ६०० या गाड्या ताब्यात घेवून  एकुण ५ लाख ९२ हजार ६७८ रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी  हस्तगत केला आहे.

Mypage

 अन्न औषध प्रशासनाचे अधिकारे बडे यांच्या समक्ष पकडलेल्या गुटख्याचा पंचनामा करण्यात आला आहे. या कारवाईत मनोहर शेजवळ, संदीप घोडके, राहुल साळुंखे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संतोष लोंढे, सागर ससाने, रोहित येमुला, रणजीत जाधव उमाकांत गावडे, भरत बुधवंत आदींचा सामावेश होता.

Mypage

दरम्यान ही कारवाई राञी उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेपासुन गुटखा विक्रेत्यावर नजर ठेवून होते. कोपरगाव शहरात पोलीस राञभर गस्त घालुन हि कारवाई केल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक पोलीसांच्या मदतीमुळे एकाचवेळी तिन गुटखा विक्रेत्यांना पकडण्यात यश आले.

Mypage