शंकरराव कोल्हेंचे कार्य राज्याला आदर्शवत – नामदार मुनगंटीवार

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : राज्याच्या राजकारणांत स्व. वसंतदादा पाटील, स्व. रत्नाप्पा कुंभार, स्व. गणपतराव देशमुख या मंडळींनी जीव ओतुन सर्वसामान्यांचे अश्रु पुसत त्यांच्या समस्या सोडविल्या त्यात स्व. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचेही योगदान अग्रभागी असुन त्यांचे कार्य राज्याला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन वनमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांनी केले. येसगांव कोल्हे वस्ती येथे नामदार मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते.

            प्रारंभी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, सुधीर मुनगंटीवार यांनी तत्कालीन अर्थमंत्री म्हणून केलेले कार्य राज्याला दिशा देणारे असून आता वनमंत्री म्हणून करीत असलेले कार्य अभ्यासु, मदतीला धावुन जाणारे असल्याचे सांगुन कोपरगांव विधानसभा मतदार संघातील १७ गावातील ९०३ नागरिकांना गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत अन्यायकारक नोटीसा बजावल्या असुन या प्रश्नांत वरिष्ठ पातळीवर लक्ष घालुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकरवी तो कायमस्वरूपी मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

          संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, डॉ. मिलींदराव कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे विश्वस्थ सुमितदादा कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुह व कोपरगांव शहर, तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले.

 जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अतितुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविण्याच्या योजनेला भर देवुन विधीमंडळ स्तरावर त्याच्या सन २००० मध्ये मंजु-या घेतल्या असुन त्यासाठी पुर्णक्षमतेने आर्थीक पाठबळ शिंदे फडणवीस शासनाने द्यावे व येथील बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांच्या पाटपाण्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवुन गोदावरी कालवे नुतणीकरणाच्या कामासह निळवंडे धरण कालवे तात्काळ पुर्ण व्हावे अशी मागणी केली.

    मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी पाच वर्षात कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असंख्य योजना विधीमंडळस्तरावर मांडुन त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला. त्या पुन्हा कोपरगांवचा आवाज बुलंद करतील. 

           याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, भाजपा प्रदेशचे विधीज्ञ रविंद्र बोरावके, सचिन तांबे, पराग संधान, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, विक्रम पाचोरे, अविनाश पाठक, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बापूराव बारहाते, बाळासाहेब वक्ते, अरूण येवले, विलासराव वाबळे, बाळासाहेब पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकाण, मच्छिंद्र टेके, नारायण अग्रवाल, सुनिल देवकर, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा बुथ व शक्ती केंद्र प्रमुख आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक विश्वासराव महाले तर जिल्हाबँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आभार मानले.