कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांसाठी २.२५ कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०३ : कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांना निधी मिळविण्याचा आ. आशुतोष काळे यांचा सपाटा सुरूच असून त्यांनी केलेल्या प्रयत्नातून मतदार संघातील विविध रस्त्यांना लेखाशीर्ष ३०५४-२४१९ अंतर्गत २.२५ कोटी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे मागील अनेक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रस्त्याची दुर्दशा असलेला मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघाची मागील काही वर्षात ओळख होवून बसली होती. त्यामुळे रस्ते विकास हे मोठे आवाहन असताना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या रस्ते विकासाला प्राधान्य देताना मिळेल त्या योजनेतून रस्त्यांसाठी निधी आणला आहे. त्यामुळे मतदार संघातील चोहोबाजुंच्या रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या वर्षानुवर्षांपासूनच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

सर्व प्रमुख जिल्हा मार्ग, जिल्हा मार्गाला जोडणारे प्रमुख रस्ते यांच्या विकासाबरोबरच प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी देखील आ. आशुतोष काळे यांनी निधी देवून या रस्त्यांचे रुपडे पालटविले असून शेकडो कोटीचे रस्त्यांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करून त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने मतदार संघातील कारवाडी, सडे, जेऊर कुंभारी, तिळवणी, मुर्शतपुर या गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २.२५ कोटी निधी मजूर केला आहे.  

या निधीतून कारवाडी येथे जिल्हा परीषद शाळा ते सांगळे वस्ती शिव रस्ता (ग्रा.मा. २७) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२५ लक्ष), सडे येथे सडे गाव ते गोपीनाथ बारहाते वस्ती रस्ता (ग्रा.मा. ५०) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (४० लक्ष), जेऊर कुंभारी येथे भानुदास वक्ते घर ते प्रभाकर बोरावके घर रस्ता (ग्रा.मा. १२६) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (४० लक्ष), कुंभारी येथे कुंभारी हिंगणी रस्ता ते साळुंके वस्ती रस्ता (ग्रा.मा. ३१५) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२५ लक्ष), कारवाडी येथे भूषण जोशी घर ते शहा हद्द (जिल्हा हद्द) रस्ता (ग्रा.मा. २७) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (४० लक्ष),

तिळवणी येथे तिळवणी ते जिल्हा हद्द (खामगाव रोड) रस्ता (इ.जि.मा.२१४) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (४० लक्ष), मुर्शतपुर येथे सीताराम शिंदे वस्ती ते प्र.जि.मा. ५ ला मिळणारा रस्ता (इ.जि.मा. १६०) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (१५ लक्ष) निधी दिला आहे. मागील अनेक वर्षापासून या गावातील नागरिकांना रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाची दखल घेवून रस्त्यांसाठी निधी दिल्याबद्दल कारवाडी, सडे, जेऊर कुंभारी, तिळवणी, मुर्शतपुर या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

मतदार संघाच्या रस्त्यांच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.