१0 व्या स्मृती दिना निमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

कोपरगंव प्रतिनिधी, दि. १७ : हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविदयालयात करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. आर. जावळे यांनी २३ जानेवारी १९२६ ते १२ नोव्हेंबर २०१२ या ८६ वर्षाच्या काळात कै. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कार्याबद्दल विदयार्थ्यांना अवगत केले.

बाळासाहेबांच्या कारकिर्दीची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून झाली. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करून बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी पुढाकार घेतला. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी निर्णायक लढा उभारला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील भगव वादळ म्हणून बाळासाहेबांना ओळखले जाते. बाळासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले. सामना या दैनिकातून त्यांनी आपले परखड विचार मांडले. मराठी माणूस आणि मराठी भाषेचे हित जोपासण्यासाठी बाळासाहेबांनी आपले जीवन व्यतित केले.

बाळासाहेबांनी हिंदूत्वाची भूमिका घेतली. त्यांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे त्यांना हिंदूहृदयसम्राट ही पदवी जनतेने बहाल केली. आखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषेची अस्मिता जपली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.