के.जे. सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा आयोजित

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धती या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व वाणिज्य संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. संतोष पगारे यांनी दिली.

या कार्यशाळेचे उद्घाटन पी.व्ही.पी. महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब रणपिसे, सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी ‘संशोधन कार्यातील कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि संशोधन कार्यपद्धती’ या विषयावर उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना संशोधक विद्यार्थ्यांनी जिद्दीने संशोधन केले पाहिजे असे प्रतिपादन केले.

दुसऱ्या सत्रात डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी ‘संशोधन माहिती संकलन’ या विषयावर बोलतांना संशोधन करतांना माहिती संकलनाचे विविध टप्पे व कार्यपद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सामाजिक संशोधन हे काळाची गरज असून संशोधक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पूर्वक संशोधन केले पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ. रवींद्र जाधव यांनी ‘एम.एस.ऑफिसच्या साहाय्याने केले जाणारे संदर्भ व्यवस्थापन व प्रबंध-लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करतांनाच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचे असे  स्पष्ट केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे यांनी महाविद्यालयातील सर्वच संशोधन केंद्रांची माहिती देतानांच वाणिज्य शाखेचे संशोधन केंद्र हे गुणवत्तापूर्ण संशोधन कण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली आव्हाड यांनी तर आभार प्रा.मुकेश माळवदे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागाचे प्रो. संजय अरगडे, प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनील गुंजाळ व प्रा.स्वागत रणधीर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीपरोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.