शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त शेवगाव तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षे वयोगट प्रथम क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये व चषक तसेच महिला वयोगटात प्रथम क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये व चषक असे दुहेरी यश मिळवले आहे.
तसेच वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अमृता लव्हाट द्वितीय क्रमांक रोख रक्कम दोन हजार रू. सन्मानचिन्ह, तर लहान गटात वैष्णवी देवढे हिने रोख रक्कम एक हजार रूपये सन्मानचिन्ह असे तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे.
खो-खो स्पर्धेतील खेळाडूंना क्रीडा शिक्षक सचिन शिरसाठ, सत्यवान थोरे, देवीप्रसाद जोशी, दीपक कुसळकर यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल संयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तर विद्यालयाने विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल प्राचार्य शिवदास सरोदे यांना मानपत्र देऊन क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गौरवण्यात आले.
या गुणवंतांचे भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश भारदे, शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.