धर्मनाथ बीजेनिमीत्त धामोरीत विविध कार्यक्रम

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील श्रीक्षेत्र धामोरी येथे अडबंगीनाथ जन्मभूमि तपोभूमि व दिक्षाभूमी गोरक्ष मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीजेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमासह नवनाथ पारायण सोहळयाचे अखिल भारतीय संत समिती ऋषीकेश येथील महामंत्री दिनानाथ महाराज व प. पू. विकासगिरीजी महाराज (मायगांवदेवी) यांच्या शुभहस्ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजन करण्यांत आले आहे. 

            २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शनिभक्त विधीज्ञ राजेंद्र बदामे यांच्या हस्ते शनि अभिषेक, सायंकाळी ५ वाजता हभप मधुकर महाराज गडाख यांचे प्रवचन तर २३ जानेवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराजांच्या हस्ते नवनाथ पुजन तर सकाळी १०  वाजता या सोहळयाची सांगता हभप शिवाजी महाराज भालुरकर महाराज यांच्या किर्तनाने होईल. अडबंगीनाथास गोरक्षांनी दिक्षा देवुन हे स्थान पवित्र केल्याचा उल्लेख नवनाथ ग्रंथात ३४ व्या अध्यायात आहे. गोरखचिंच ही रोगनाशक असून धामोरीत विशाल चिंचवृक्ष आजही इतिहासाची साक्ष देत आहे.