स्व. भालेराव यांच्या पुण्यतिथी निमित्त बालकांना फल आहार वाटप

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : स्वर्गीय योगेश चंद्रकांत भालेराव या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे अकाली निधन झाल्याने श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेचे भरून न येणारे नुकसान झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे सर व्यवस्थापक राजेंद्र नांगरे यांनी येथे केले.

श्री रेणुका मल्टीस्टेट संस्थेचे ज्येष्ठ संचालक स्व. योगेश भालेराव यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री रेणुका मल्टीस्टेटच्या सर्व शाखा मधून विविध उपक्रम राबवून त्यांच्या स्मृती जागविण्यात येतात. शेवगाव शाखेच्या वतीने ऊस तोड मजुराच्या निराश्रीत मुलामुलींसाठी येथील उचल फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वस्तीगृहातील बालकांना फल आहार वाटप करण्यात आला.

यावेळी प्रा. जनार्दन लांडे, श्याम पुरोहित, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकनाथराव कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, नारायण फुंदे, राजेंद्र सराफ उपस्थित होते. प्रारंभी उचल फाउंडेशनचे सचिव खेडकर यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रा. लांडे यांचेही भाषण झाले. गणेश सुरवसे यांनी आभार मानले. 

ReplyReply allForward