शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : महाविकास आघाडीच्या काळात आमदार मोनिकाताई राजळे यांना तुटपुंजा निधी मिळत असे. सत्तातंरानंतर शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून मोठ्या प्रमाणात निधी मिळू लागल्याने या भागाच्या विकासाला गती आली आहे. त्याचाच परिपाक म्हणून या भागातील प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लागलीत.
कामांचा प्रारंभ देखील आज होत असल्याचे स्पष्ट करुन आमदार राजळेवर अनाठायी होत असलेल्या विरोधकाचा समाचार घेतांना विरोधकांना मतदानाच्या माध्यमातून जनताच आगामी काळात रोखठोक उत्तर देईल असे प्रतिपादन भाजपचे तालुका चिटणीस तथा ज्येष्ठ नेते रामजी केसभट यांनी येथे केले.
अर्थसंकल्प जुलै २०२२ अंतर्गत बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई रस्ता ( रा.मा. ५० ) अंतर्गत कि.मी. २३५/८०० ते २३७/०० मध्ये बोधेगाव गावअंतर्गत काँक्रीटीकरण तसेच उर्वरित मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, शेवगाव-गेवराई रस्ता ( रा.मा.५० ) कि. मी. २३२/०० ते २३५/८०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, या ४ कोटी २५ लक्ष रूपये किंमतीच्या कामांचा शुभारंभ आज सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात केसभट बोलत होते.
यावेळी केसभट यांनी, सध्या विरोधक आमदार राजळे यांचेवर केवळ विरोधासाठी विरोध करत बीनबुडाची टीका करत आहेत. या भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आमदार राजळे यांनी मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे त्यांच्या लक्षात येत नाहीत. विरोधकांनी विरोध न करता या दोन्ही तालुक्यातील कामांची पाहणी करुन तीन-चार वर्षाच्या कालावधीत आ. राजळे यांनी किती निधी उपलब्ध केला याचा आढावा घेवून त्यानंतर विरोध केला पाहिजे.
टीका करणे सोपे, मात्र कामाच्या दृष्टिकोनातून आज जनतेच्या मनामध्ये काय आहे हे सर्वश्रृत आहे. सर्वसामान्य जनता आज एक तडफदार आणि कामाचे आमदार म्हणून राजळे यांचा उल्लेख करते. म्हणून विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे राजकारण करु नये. जनताच याचे उत्तर मतदानाच्या माध्यमातून देईल असा टोला केसभट यांनी शेवटी लगावला. मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी कामांचा शुभारंभ करुन शुभाशिर्वाद दिले.
यावेळी भाजपचे नेते संदिप देशमुख, सरपंच सुनील राजपूत, सरपंच दादासाहेब भुसारी, सरपंच संजय खेडकर, केशव आंधळे, ग्रामपंचायत सदस्य प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते सुगंध खंडागळे, बाबा सवळकर, दत्तू जाधव, देवढे अप्पा, शेरखाभाई पठाण, दत्ता थोरात, अनिल परदेशी, बबनराव घोरतळे, राजेंद्र डमाळे, बाबासाहेब मगर, श्रीरंग गोरडे, कुद्दुस पठाण, राजळे फिटर, रामेश्वर डाके देवा, पांडुरंग घोरतळे, राजेंद्र बनसोडे, गोटू पोटभरे, अशोक बाणाईत, दामूअण्णा वीर, बाळासाहेब केसभट, बाळासाहेब लवंगे, विश्वनाथ घोरतळे, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे, बळीराम गरड, नारायण गरड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, शाखाअभियंता रामेश्वर राठोड , सुरेश घुले तात्या, शाखा अभियंता मयुर काकड ‘ ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा सवळकर यांनी आभार मानले.