केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना ओबीसींच्या फायदयाची – गाडेकर 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी विश्वकर्मा योजना ही ओबीसींच्या फायद्याची आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक गरीब ओबीसी कुटुंबाना फायदा झाला आहे. केंद्रात भाजपचे पुन्हा सरकार राहिले तर अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ओबीसींचा मोठा फायदा होईल असा विश्वास भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी व्यक्त केला.

ओबीसी मोर्चाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील समनापूर, वडगाव पान, जोर्वे व अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. सर्व ओबीसी समाज हा मोदी अब की बार चार सो पार या नाऱ्या सोबत असून महाराष्ट्रात देखील पंचेचाळीस पेक्षा जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ओबीसी मोर्चाची महिला आघाडीसह किसान मोर्चाचे देखील पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी विश्वकर्मा योजनेबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. या योजनेंतर्गत पारंपारिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जात असल्याचेही गाडेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील  मंत्रिमंडळ समितीने यासाठी तेरा हजार कोटीं रूपयांची तरतुद केली आहे. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील अनेक गरीब ओबीसी कुटुंबाना या योजनेचा फायदा झाल्याचेही गाडेकर यांनी सांगितले. 

यावेळी भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भारत गवळी,  सौरभजी कोळपकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत,  विधानसभा अध्यक्ष बाबुराव खेमनर, चिटणीस शिवकुमार भंगिरे, तालुका अध्यक्ष गोरक्ष मंडलिक, शहर सरचिटणीस निलेश रणाते, पांडुरंग शेराल, बुथ रचना संयोजक विकास गुळवे, किसान मोर्चा उपाध्यक्ष रोहीदास साबळे, भाजपाचे मा शहर अध्यक्ष सिताराम मोहरीकर, गजानन गडगे, दिपक इंगळे, मच्छिंद्र शिंदे, बाळासाहेब मंडलिक तसेच भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष कांचनताई ढोरे, जिल्हा सरचिटणीस रेशमाताई खांडरे, रूपाली उंडे,  जिल्हा उपाध्यक्ष ज्योती भोर, अरूणा पवार, सुशिला कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते.