कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी तसेच काही शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण २.१७ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी.यासाठी ज्या गावात नवीन शाळा खोल्यांची आवश्यकता आहे व ज्या शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये १५ शाळा खोल्या बांधण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रुपये व २४ गावांतील ७४ शाळा खोल्या दुरुस्तीसाठी ३७ लक्ष रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
धामोरी मांजरे वस्ती (०२), माहेगाव देशमुख(०३), सांगवी भुसार (०२), खिर्डी गणेश चांदर वस्ती (०१), वडगाव (०१), पढेगाव (०१), कोकमठाण गावठाण (०१), रांजणगाव देशमुख (०१), उक्कडगाव कारवाडी (०१), हिंगणी (०१), शहाजापूर (०१) या शाळा खोल्यांची होणार दुरुस्ती शहापूर (०४), शहापूर ओसपंढरी (०३),चांदेकसारे आनंदवाडी (०४), घारी (०२), ब्राम्हणगाव बनकर वस्ती (०६), धारणगाव देववस्ती (०२), मळेगाव थडी बडदे वस्ती (०२),
करंजी बु.(०२), कोकमठाण थोरात वस्ती (०२), तीळवणी (०२), मळेगाव थडी (०३), शिरसगाव उर्दू शाळा (०२), पढेगाव शिंदे वस्ती (०३), रवंदे शिंदे वस्ती (०३), तळेगाव मळे (०६), धोत्रे रोकडे वस्ती (०२), कोकमठाण रेलवाडी (०३), संवत्सर निरगुडे वस्ती (०२), डाऊच उर्दू शाळा (०४), सोनेवाडी (०४), दहेगाव (०४), उक्कडगाव रेणुकानगर (०२), आपेगाव (०३),शहाजापूर (०४) या शाळा खोल्यांचा समावेश आहे.