कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ एप्रिल २०२६ : प्रसिद्ध लेखक व प्रेरणादायी वक्ते रॉबिन शर्मा यांच्या मते, यश प्राप्त करण्यासाठी सातत्य आणि कठीण परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते सांगतात की दररोज स्वतःला कालपेक्षा थोडे अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून, यश एका दिवसात मिळत नाही तर ते सातत्यपूर्ण प्रयत्नांतून घडते. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

संशोधनानुसार, मानवी मेंदूत दररोज सुमारे ६२०० विचार येतात, त्यापैकी ७० ते ८० टक्के विचार नकारात्मक असतात आणि त्यातील बहुतेक विचार पुढील दिवशी पुन्हा येतात. त्यामुळे वर्तमानावर लक्ष केंद्रित करून, आपल्या उद्दिष्टांची स्पष्ट आखणी करून आणि सकारात्मक विचारांची जोपासना केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजने सन २०२४-२५ मध्ये संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्मृतिप्रित्यर्थ इ. ११वी च्या प्रवेशाच्या वेळी घेतलेल्या ‘संजीवनी टॅलेंट सर्च’ या परीक्षेत पहिल्या ३० गुणानुक्रमाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा उत्सव २०२६’ या कार्यक्रमात गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ. कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या.

यावेळी हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , प्राचार्या रेखा साळुंके, उपप्राचार्य प्रा. मोहन सोनवणे, समन्वयक प्रा. सागर निकम, आदी उपस्थित होते. या परीक्षेत सध्या इ. १२ वीला जाणारे सायन्स विभागाच्या २६ व कॉमर्स विभागाच्या ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एकुण ४०० विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिध्द करण्याचा प्रयत्न केला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू १०,००० चे रोख बक्षिस व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

योवळी विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनिय होती. प्रारंभी प्राचार्या साळुंके यांनी सर्वांचे स्वागत करून स्व. कोल्हे यांचे विचारधारेनुसार संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनानुसार संजीवनी ज्यु. कॉलेज गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत असुन त्याचे सकारात्मक निष्कर्ष हाती येत आहे. डॉ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, भविष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करून चांगले करीअर निवडा व आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करा.

यावेळी सायन्स व कॉमर्स मधिल विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात पार्थ रहाणे, शुभम धनवटे, अर्णव गोर्डे, साई कोळसे, समृध्दी जाधव, चैतन्य जाधव, सुरेश शिंदे , तनिष्का गाडेकर, समृध्दी गायकवाड, धिरज पटारे, साई शिंदे , शिवेंद्रादित्य देशमुख, वेदिका जाधव, संग्राम आरोटे, समर्थ टेके, अनिकेत कोळपे, श्रध्दा चव्हाण, रचित आगवन, श्लोक शिंदे , गिरीजा एंडाईत, आदित्य बरवंट, अनुष्का अष्टेकर , आदर्श देशमुख, शंतनू भुसे, देवदत्त जोशी , क्षितिज ढोकळे, नावकर मुथा, तनिष्का वल्टे, श्रावणी वरोडे व क्रिष्णा सांगळे यांचा समावेश आहे. डॉ. शेंडगे यांनी भविष्यातील स्पर्धा परीक्षांविषयी माहिती दिली.


