कोपरगाव नगरपरिषदेत जागतिक ग्रंथ दिन पुस्तकांची गुढी उभारून साजरा

कोपरगाव प्कोरतिनिधी, दि.२३ : कोपरगाव नगरपरिषदचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला आहे.

कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे संकल्पनेतून जागतिक ग्रंथ दिनानिमित्त पुस्तकांची गुढी उभारून तसेच युवा वाचकांचा संवाद मेळावा घेऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य व स्वच्छतादूत सुशांत घोडके, उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल, ग्रंथपाल महेश थोरात, राजेंद्र शेलार दीनदयाल अंत्योदय योजनेचे रामनाथ जाधव, प्रा.राजेश मंजुळ, अनंत बर्गे उपस्थित होते.

या प्रसंगी स्वच्छत:दूत सुशांत घोडके म्हणाले, “ग्रंथ हेच गुरु” असून तरुणांनी ग्रंथ ज्ञानाच्या संपदेतून अज्ञानाचा अंधकार दूर करावा. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी वाचनालयाच्या माध्यमातून उपलब्ध सोयी सुविधांची माहिती दिली.

उपस्थित युवा वाचकांनी आपापले मनोगत व्यक्त करुन देत वाचनालयाचे सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन गणेश वैद्य, सारिका राक्षे यांनी तर आभार रामनाथ जाधव यांनी मानले. याप्रसंगी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते