कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगाव येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी चि. तन्मय महाजन याने नामांकित खेळाडूंवर मात करत एकूण ६ डावामध्ये पाच विजय व एक सामना बरोबरीत सोडत एकूण ५.५ गुण मिळवून स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान मिळविला.
या स्पर्धेत एकूण अहमदनगर जिह्यातील १०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याची अहमदनगर जिल्ह्यातून निवड झाली आहे
तन्मय महाजन हा के.जे. सोमय्या महाविद्यालयात बी.सी.एस. द्वितीय वर्षात शिकत असून या पूर्वीही त्याने बुद्धीबळ स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. नुकत्याच कोपरगाव चेस व स्पोर्ट्स आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळविला होता. त्याला क्रीडाशिक्षक सुनिल कुटे, कांबळे सर, नितीन सोळके यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
चि. तन्मय याच्या यशस्वी कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकरावजी रोहमारे, संदीप रोहमारे, संजीव कुलकर्णी, विठ्ठल शिंदे, संतोष महाजन, रमेश येवले, अथर्व थोरात, कोपरगाव चेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद वाणी, राजेंद्र कोळपकर, नितीन जोरी, यश बंब, महेश थोरात, संकेत गाडे, विशाल पंडोरे, वैभव सोमासे, साक्षी गाडे अदिंनी अभिनंदन केले आहे.