वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त विक्रेत्यांचा सन्मान

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, १८ : भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन व भारतीय वृतपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधत येथील र.म.परीख हिंदी-मराठी सार्वजनिक वाचनालयात पाऊस, थंडी, उन्हाची पर्वा न करता वृत्तपत्रांचे वितरण करून वाचन संस्कृती रुजविण्यास मदत करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा समता परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Mypage

प्रमुख पाहुण्या म्हणून नामदेवरावजी परजणे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पवार होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे, कार्यवाह सुरेश गोरे यांच्यासह वाचक, विद्यार्थी उपस्थित होते. जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या ताराबाई पवार यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

Mypage

डॉ. पवार यावेळी म्हणाल्या, वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पुस्तकामुळे माणसाच्या आयुष्याला दिशा मिळते. कल्पना विस्ताराला चालना मिळते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री करून विद्यार्थी जीवनात वाचनाची सवय अंगिकारणे गरजेचे आहे.

Mypage

पद्माकांत कुदळे म्हणाले,  “वाचनसंस्कृतीच्या प्रसाराची गरज आहे.  पुस्तके भरपूर आहेत, मात्र वाचक नाहीत. पुस्तकांच्या सहवासात माणसाचा एकटेपणा दूर होतो. पुस्तकांसारखा दुसरा अन्य सोबती नाही.” पुस्तक प्रदर्शनाचे यावेळी आयोजन करून त्यात चरित्रे, आत्मचरित्रे, बालसाहित्य आदी पुस्तके ऊपलब्ध करुन देण्यात आली.

Mypage

विक्रेते माणिकराव उगले , अविनाश पाटील, वाचक प्रतिनिधी अनंत बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल योगेश कोळगे, प्रमोद येवले आदी प्रयत्नशील होते. यावेळी तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

वृत्तपत्रे विक्रेत्यांच्या अनेक समस्या असून त्याची शासन दरबारी दखल घेणे आवश्यक आहे. कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. तो अविस्मरणीय ठरला—बाळासाहेब आहेर, अध्यक्ष, कोपरगाव तालुका विक्रेता संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *