२४ तासात दरोड्यातील तीन आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : नऊचारी (संवत्सर) येथील अनिल सोनवणे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यां प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण नगर शाखेने तपासाची चक्रे फिरवत केवळ चोवीस तासात तीन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले.आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे.दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले (रा. कारवाडी, कोकमठाण, कोपरगाव), अनिल अरुण बोबडे (रा. वेस,ता.राहाता), राहुल दामू भोसले (रा. जेऊर पाटोदा, कोपरगाव) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

Mypage

१५ सप्टेंबर रोजी रात्री पाऊण वाजता अनिल सोनावणे यांच्या घराचे दरवाजे लोखंडी सळईने तोडून चाकूचा धाक दाखवून सोनवणे व त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत गंभीर जखमी करून पावणे दोन लाखांचा रोकड व सोन्याचे दागीनेंचा मुद्देमाल सात दरोडेखोरांनी लुटून नेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा दिलीप भोसले याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली.

tml> Mypage

तपासाची चक्रे फिरवत कटके यांनी  कारवाडी शिवारात सापाळा रचला. आरोपींच्या ठावठिकाणा मिळताच छापा घातला असता आरोपीसह इतर इसम पळून जाऊ लागले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करत मोठ्या शिताफीने तीन हि आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तर दिली.

Mypage

मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी इतर साथीदारांसह गुन्हा केला असल्याचही कबुली दिली. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एकंदरीत केवळ चोवीस तासात आरोपींचा शोध लावल्याने पोलिस विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

Mypage