राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अध्यक्षपदी अस्लम शेख

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेच्या राष्ट्रीय महामार्ग समितीच्या बोर्ड कमिटीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील चापडगाव येथील अस्लम हुसेन शेख यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.

Mypage

      या बोर्ड कमिटीच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्यस्तरिय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच अपघाताच्या घटना झाल्यांनतर अपघातातील जखमींना पोलीस दलाच्या सहकार्याने तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी संघटनेमार्फत आवश्यक उपायोजना राबविण्यासाठी जाणीव पूर्वक काम करण्याचा मानस असल्याचे शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

Mypage

       शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विविध भागात नँशनल अँटी करप्शन अँन्ड कंट्रोल क्राईम ब्युरो, राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन आदी संघटनेच्या माध्यमातून पोलीस विभागाला योग्य ते सहकार्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु असून या पुढील काळातही राष्ट्रीय महामार्ग बोर्ड कमिटीच्या माध्यमातून रस्ते अपघाताच्या घटनेत योग्य ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक काम करण्याचे नूतन अध्यक्ष शेख यांनी सांगितले.

Mypage

       त्यांच्या निवडीचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत उपाध्याय, प्रदेश महिलाध्यक्षा  जयश्री शाम ससाणे, कल्याण देवढे, विभागीय अध्यक्ष सोमनाथ जाधव, अभिजित इंगळे, रामकिसन महाराज तापडिया आदींनी अभिनंदन केले आहे. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *