कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०१ : गेल्या २० वर्षापासून धोत्रे गावचा विकास होणे अपेक्षित होते आजूबाजूच्या ६ ते ७ गावांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोत्रे गावचा विकास झाला नाही, फक्त मतांसाठी राजकारण केले जाते, परंतु सण १९९५ चा पंचवार्षिक मध्ये माजी सरपंच विष्णू एकनाथ पाडेकर यांनी धोत्रे येथील पाण्याची बिकट अवस्था होती. सरपंच असताना गोधेगाव येथून पाण्याची पाईपलाईन आणून धोत्रे गावासाठी पाण्याची अडचण दूर केली. परंतु त्यानंतर कोणतेच मोठे काम गावच्या विकासासाठी झाले नाही.
घरकुल योजनेत देखील प्रचंड भ्रष्टाचार झाला, गोरगरिबांना त्रास देण्यात आला, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, समृद्धीच्या नावाखाली अनेकांमध्ये तेढ निर्माण करून भीतीदायक वातावरण तयार केले गेले. त्यामुळेच धोत्रे गावच्या विकासासाठी राजकारण न करता समाजकारण लोकहित जपण्यासाठी काँग्रेसचे तालुक्यातील नेते, शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते, भ्रष्टाचार विरोधी लढणारे, नेते गोरगरिबांसाठी जिवाचं रान करणारे नेते अशी ओळख असणारे विष्णू पाडेकर यांना लोकांच्या आग्रहास्तव लोकनियुक्त सरपंच व्हावे अशी इच्छा असल्याने सरपंच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गावातील घाणेरडे स्थानिक राजकारण बंद करून गावच्या विकासासाठी हे पाऊल उचलले तसेच जाहीरनामा सादर करून गावात मुबलक पिण्याचे पाणी, आठवडे बाजारासाठी सुसज्ज जागा, गावातील वाडी वस्त्यांवरील अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारी, व्यायामशाळा, वाचनालय, डिजिटल मराठी शाळा घरकुले, विविध शासकीय योजना अशा विविध विकास कामे करणार असे विष्णू एकनाथ पाडेकर यांनी जाहीरनाम्यात सांगितले. येत्या रविवारी ग्रामस्थांनी सक्षम उमेदवार विष्णु एकनाथ पाडेकर यांना बॅट या चिन्हाला मत देऊन धोत्रे गावच्या विकासासाठी संधी द्यावी असे आवाहन विष्णू एकनाथ पाडेकर यांनी केले.
भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत उमेदवार विष्णू पाडेकर यांच्या प्रचारार्थ कोपरगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश नागरे, छोटूभाई पठाण, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, रवींद्र साबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.