२७ पैकी १३ ग्रामपंचायतीवर भाजप कोल्हे गटाचे उपसरपंच

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या २७ ग्रामपंचायती पैकी तेरा ठिकाणी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे उपसरपंच निवडले गेले आहेत असून सर्वाधिक १२२ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.

तीन टप्प्यात उपसरपंच पदाच्या निवडी नुकत्याच झाल्या, त्यात शिंगणापूर, पढेगाव, खिर्डीगणेश, रांजणगाव देशमुख, हंडेवाडी, देरडे कोऱ्हाळे, बहाराबाद, चासनळी, धारणगाव, खोपडी, तळेगावमळे, सोनेवाडी, न.पा.वाडी या 13 ठिकाणी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे सर्वाधिक उपसरपंच निवडले गेले आहे.

या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे, तर वेस सोयगाव, वडगाव येथे अपक्ष सदस्यांनी उपसरपंचपदी बाजी मारली आहे. करंजी येथे शिवसेनेचा उपसरपंच निवडला गेला आहे.