शेवगावात आनंदाच्या शिध्यासाठी नागरिक प्रतिक्षेत

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०१ : दिपावलीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. तरीही येथील लाभधारकांना अद्याप आनंदाच्या शिध्याच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्यातील प्राधान्य कुटूंब कार्ड लाभधारक ३२ हजार ७६६ व अंत्योदयचे ९ हजार ७५६ अशा एकूण ३९ हजार ८८५ लाभधारकांसाठी आज अखेर केवळ ३७ हजार आनंदाचा शिधा संच शेवगाव पुरवठा विभागात प्राप्त झाले असून, त्यातही लाभधारकाला शंभर रुपयात वाटप करावयाच्या साखर, पामतेल, हरभरा दाळ, रवा, मैदा, पोहे या वस्तूं पैकी काही वस्तू अद्यापपर्यंत उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती समजली. त्यामुळे तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपास केव्हा सुरवात होणार ? याबाबत साशंकता आहे.

Mypage

 राज्य शासनाने या बाबत सुमारे एक महिन्या पूर्वी या उपक्रमाचा मोठा गाजावाजा करत प्रसिद्धी केली असताना दिपावली सारखा महत्वाचा सण तोंडावर येऊन ठेपला असताना या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी या वा त्या कारणाने लांबणीवर पडली आहे. गोरगरिब कुटूंबीयाना त्याची प्रतिक्षा लागली आहे.

Mypage

गौरी गणपतीच्या कालावधीत साखर, हरभरा दाळ, पामतेल व रवा या चार वस्तू प्रत्येकी एक किलोचा आनंदाचा शिधा संच प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना शंभर रुपयात वाटप करण्यात आला. दिवाळीसाठी प्रत्येकी अर्धा किलो मैदा व पोहे वाढविण्यात आले. मात्र, पूर्वीच्या शिधा संचामधील रवा व हरभरा दाळ या वस्तूमध्ये प्रत्येकी अर्धा किलो कपात केली. हे सर्वसामान्यांना पटले नाही. राज्य शासनाच्या संवंग लोकप्रियतेच्या या निर्णयाचा जनतेच्या दृष्टीने लाभ नाही.
                    प्रितम गर्जे,
         शेवगाव शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी