हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे रामनाथ कोकाटे बिनविरोध

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : तालुक्यातील हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा कोल्हे गटाचे रामनाथ निवृत्ती कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. 

         उपसरपंच रामनाथ कोकाटे यांचा वेळी सत्कार करण्यांत आला. या निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरद कोकाटे, सयाजी घुमरे, कमलाबाई घुमरे, रंजना पुरी, अनिता सोनवणे तसेच शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, हंडेवाडीचे ग्रामस्थ मधुकर कोकाटे, शिवाजीराव घुमरे, माधवबाबा पुरी, संतोष सोनवणे, सुभाष कोकाटे, केशवराव कोकाटे, संजय कोकाटे, सतिष कोकाटे, प्रसाद कोकाटे, संदिप कोकाटे, विठठल घुमरे, अमोल घुमरे, अनिल मोरे, प्रसन्न कोकाटे यांच्या सह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.