महाराष्ट्र सिईटी मध्ये  “श्रीगणेश” अव्वल, ५३ विद्यार्थ्यांना ९० परसेंटाईलच्या पुढे गुण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : २०२३  मध्ये झालेल्या अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये  श्रीगणेशच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले. यामध्ये प्रांजल शेटे या विद्यार्थिनीने  ९९.५७ गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.अशी माहिती प्रा. विजय शेटे यांनी दिली.

    या परीक्षेत अभियांत्रिकी सीईटी मध्ये अर्चित शेलार ९९.४१ ,रिद्धी लहारे ९९.३७, प्रणव साळुंके ९८.७६ ,साई गवळी ९८.७१ , सुरज खैरे ९८.१४ , विराज गोर्डे ९७.५१ , सिद्धेश दवंगे ९७.४९,ओंकार डहाळे ९६.१४ , वैष्णवी बोरनार ९५.८८ , ज्ञानदा लहामगे ९५.४९, प्रतिक्षा  राहाणे ९५.३९,सार्थक जगताप ९५.३३ , अनुज दिंडे ९५.२७ ,अनिकेत आढाव ९५.२१ ,अजित चव्हाण ९५.२१ , प्रेरणा भामरे ९५.२१, तनुजा घाटे ९४.८०, अनुष्का पंडोरे  ९४.६२,रितेश देशमुख ९४.५४ , भूषण सोनवणे ९४.२२, यश गवळी ९३.९९, वैष्णवी नरोडे  ९३.८१,सुमित पगार ९३.३८, जय होन ९२.९०, अमन जैस्वाल ९२.१७, साईश बावके ९२.१५ , अंजली भामरे ९१.७४, सर्वज्ञ जाधव ९१.२९, साक्षी कमोदकर ९०.९० 

तर औषधनिर्माण शास्त्र प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये   रोहीत  काकड ९८.३७, साक्षी मते ९६.१४ , सार्थक लोंढे ९५.६५, समृद्धी गुजराथी ९५.६२, ज्ञानदा लहामगे ९४.५ , अजित चव्हाण ९७.९३ , प्रेरणा भामरे ९३.२३,वैष्णवी कर्पे ९४.८९, रेहान सय्यद ९४.१६ , संस्कृती मते ९४.००, यश गवळी ९३.८१ , श्रुती डेरे ९३.९७ , साक्षी सापिके ९३.९७ , जय होन ९२.७८, साक्षी शेळके ९२.१७, पायल गायकवाड ९३.२७ , ऋतुजा भागवत ९०.७८ परसेंटाईल मिळवून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रातील व्यवसाय शिक्षणासाठी पात्र ठरले आहे.

        या सर्व विद्यार्थ्यांना श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे व सहकारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्रीगणेश शैक्षणिक संकुलाच्या  श्रीगणेश पॅटर्न ने पुन्हा एकदा एकदा उंच भरारी घेतली आहे.सर्व विद्यार्थी भविष्यात आधुनिक अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र  तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन हे विद्यार्थी विविध क्षेत्रात स्वतःचे ,पालकांचे देशाचे नाव उज्ज्वल करतील,अशी प्रतिक्रिया प्रा. विजय शेटे यांनी व्यक्त केली.

 श्री गणेश शैक्षणिक संकुलात दोन वर्ष सातत्याने माझ्या पाल्याची जेईई परीक्षेची तयारी करून घेतली.यामुळे माझ्या पाल्याला बोर्ड , जेईई व महाराष्ट्र सिईटी परीक्षेत उत्तम गुण मिळाले.हि श्री गणेशच्या इंटिग्रेटेड पॅटर्नची जादू आहे.  – संजय गवळी (पालक)