श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.

           सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यांचा तृतीय क्रमांक, कृष्णा चौधरी, तन्मय पेंडभाजे यांचा चतुर्थ क्रमांक तर सुमती गमे, ओम लांडगे, श्रेयश कोते यांनी पाचवा क्रमांक मिळविला.

                        विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल , गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रामनाथ पाचोरे, पंकज खडांगळे पर्यवेक्षक प्रा.प्रवीण चाफेकर, निलेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विजय जगताप, आदिनाथ दहे, अनिता कुदळे, दिपक गव्हाणे यांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले.