कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील दहिगांव बोलका येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सिताराम राशिनकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगांव तालुका सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यांत आली आहे.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड व राष्ट्रीय सरचिटणीस विजयराव कदम यांच्या संयुक्त स्वाक्षरीने त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपकराव धट उपस्थित होते.
मराठा क्रांती स्वराज्य संघटेनेचे महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात संपर्काचे जाळे असुन संघटनेने आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावून त्याची सोडवणुक केली आहे. या पदाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देवुन तालुका स्तरावर असलेले प्रश्न सोडवुन समाजाचे संघटन वाढवू अशी प्रतिकिया नवनिर्वाचित सचिव सोमनाथ राशिनकर यांनी दिली. त्यांच्या निवडीबददल सर्वथरातून अभिनंदन होत आहे.