शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : जिल्हा परिषद व शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धामध्ये जि.प. प्रा. शाळा ठाकूर निमगावच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.
या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकासह एकूण सात स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यामध्ये तेजल गणेश कातकडे हिने किशोर गट वेशभूषेसह सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. याशिवाय वकृत्व स्पर्धेत प्रतीक्षा निजवे व कल्याणी निजवे हीने, कथाकथन स्पर्धेत तेजश्री भगत, वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत वैष्णवी निजवे, हस्ताक्षर स्पर्धेत आरती गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपापल्या स्पर्धा गटात यश मिळवले आहे.तसेच समूहगीत गायन स्पर्धेत मोठ्या गटाने यशस्वी कामगिरी केली आहे.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाबुराव मुटकुळे, दैवशीला राऊत, कल्पना बोडखे, शारदा डोईफोडे, कल्याण शिंदे, अविनाश काटे, श्रीकृष्ण शेळके, विशाल घोडसे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते , शिक्षण विस्ताराधिकारी शैलजा राऊळ, गाडेकर, केंद्रप्रमुख गिऱ्हे तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.