स्व.किसनराव काटे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, अस्थिरोग निदान शिबिर संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ :  कामगार नेते स्व. किसनराव काटे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी तालुक्यातील आखेगाव येथील छत्रपती संभाजी राजे पब्लिक स्कूल ॲ. ज्यूनि कॉलेज मध्ये आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, अस्थिरोग निदान तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ९६ रुग्णांनी मोफत शिबीराचा लाभ घेतला.

नेत्र तपासणी शिबिर शेवगाव रोटरी क्लब, पुण्याचे बुधराणी हॉस्पिटल व काटे शैक्षणिक संकुल, यांच्या संयुक्त विद्यमाने तर अस्थिरोग निदान मणक्यांचे आजार यांचे मोफत निदान व सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया शिबिर काटे शैक्षणिक संकुल व गायकवाड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले होते. या शिबीरा चा ९६ रुग्णांनी लाभ घेतला.

यावेळी विद्यालयातील विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण व स्टूडेंट ऑफ द इयर पारितोषिक वितरण करण्यात आले. शिबिरासाठी अंधमुख व्हिलेज संकल्पनेचे रो. बाळासाहेब चौधरी, डॉ.प्रतीक्षा, डॉ. प्रवीण गायकवाड, शैक्षणिक संकुलाचे प्रा. शिवाजीराव काटे, ॲड.सिद्धार्थ काटे, जयश्री काटे, प्रा.अविनाश बंड यांनी विशेष योगदान दिले.

यावेळी श्रीमती सुमन काटे, डॉ. संगीता काटे, प्रा.कविता मगर, दत्तात्रय झिंजुर्के, मुरलीधर नाचण, बाबासाहेब गोर्डे, शीतल पुरनाळे, प्रभाकर बोडखे, रामचंद्र झिंजुरके, श्रीकांत शिंदाडे, महेश मिसाळ, अशोक गवते, रामराव जवरे, देविदास नजन आदी मान्यवर उपस्थित होते.