भिडे वाड्याच्या संवर्धनासाठी ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ब्रिटिश राजवटीत १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या ऐतिहासिक भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबद्दल कोपरगाव येथील ओबीसी समाजाच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारचे विशेष ठरावाद्वारे अभिनंदन करण्यात आले.

देशात पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, अस्पृश्यता निर्मूलन करण्यात मोलाची कामगिरी करणारे थोर समाजसुधारक व सत्यशोधक विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मंगळवारी (११ एप्रिल) कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित शहरातून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच सर्वांना महात्मा फुले जयंतीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  

स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, देशाच्या सामाजिक जडणघडणीत अनेक महापुरुषांचा वाटा आहे. यामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे योगदान आहे. महात्मा फुले यांनी भारतात पहिल्यांदा मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मोठ्या कष्टातून पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

महात्मा फुले यांनी त्या काळात अनेक अडचणींना तोंड देत स्त्री शिक्षणाद्वारे उपेक्षित समाजाला ज्ञानाचा मार्ग खुला करून दिला. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. फुले दाम्पत्यामुळेच मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आणि स्री शिक्षणाची व सामाजिक क्रांतीची चळवळ सुरू झाली.

पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था झाल्याने त्याचे संवर्धन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ५० कोटींची तरतूद केली आहे. याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आभार मानले. 

पुण्यातील भिडे वाड्याचे जतन करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केल्याबद्दल समस्त ओबीसी समाजबांधवांच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला. संजीवनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले यांनी हा ठराव मांडला, तर लोकस्वराज्य आंदोलनचे अध्यक्ष अॅड. नितीन पोळ यांनी त्यास अनुमोदन दिले.

याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, ज्योती पतसंस्थेचे संस्थापक अॅड.रविकाका बोरावके, बापूसाहेब इनामके, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले,  विजयराव आढाव, जितेंद्र रणशूर,  माजी नगरसेवक जनार्दन कदम, प्रमोद नरोडे, विष्णुपंत गायकवाड, संजय खरोटे, गोरख देवडे,  सतीश रानोडे, सलीम पठाण, मनीष जाधव, तुषार जमदाडे, कैलास सोमासे, बापू वढणे, प्रभाताई नवले, वैजयंतीताई बोरावके, कविताताई बोरावके, काजल गलांडे,

स्वप्ना जाधव, राधिका पाटील, संगीता मालकर, संध्या राऊत, सई रासकर, छायाताई गिरमे, रोहिणी गिरमे,  राजश्री गिरमे, सोनाली टिळेकर, पुष्पांजली बोरावके, गीतांजली चौकडे, अंजली भोंगळे, संगीता शिवूरकर, कावेरी राऊत, मंदाताई रासकर, वर्षा ससाणे, जयश्री बोरावके, उमा गिरमे, मीनल रासकर, अश्विनी गायकवाड, अनिता बोरावके, रूपाली बोरावके, वर्षा आगरकरे,  गीताताई रासकर, बाळासाहेब पांढरे,

मच्छिंद्र पठाडे, दिनार कुदळे, दिलीप बनकर, बाबा नेवगे, राजेंद्र बागुल, सचिन ससाणे, प्रशांत भास्कर, विशाल राऊत, प्रा. संदीप जगझाप, रवींद्र पठाडे, ओंकार वढणे, कैलास माळी, सचिन बोरावके, अनुप गिरमे, रवींद्र चौधरी, विरेन बोरावके,अक्षय गिरमे,गोरे सर, मिलिंद झगडे, रत्नाकर पिंगळे, सुमीत भोंगळे, प्रशांत शेवते आदींसह ओबीसी समाजबांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.