संजीवनीच्या १६ अभियंत्यांची मदरसन, अप्टिव्ह , टेनो, टेट्रा आणि कनेक्टवेल कंपनीत निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २७: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागच्या प्रयत्नाने टेट्रा पॅक इंडिया प्रा. लि.,टेनो टेक्नॉलाजिज, अॅप्टिव इंडिया, मदरसन टेक्नो टुल्स लि. व कनेक्टवेल इंडस्ट्रिज या नामांकित कंपन्यांनी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन १६ अभियंत्यांना  रू ३ लाख ते रू ६ लाख वार्षिक  पगाराचे नेमणुक पत्रही दिले आहे.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उद्योगाभिमुख तंत्रज्ञानाधिष्ठित अभियंते निर्मितीचा फंडा अवलंबविल्याने संजीवनीचे नवोदित अभियंते नामांकित कंपन्यांच्या पसंतीस उतरत आहेत, अशी  माहिती इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकातद्वारे दिली आहे.           

 या निवडींमध्ये टेट्रा पॅक इंडिया कंपनीने ऋतुजा काकासाहेब गणगे हिची रू ६ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड केली आहे. टेनो टेक्नॉलॉजिज या कंपनीने तेजस भरत वालझडे याची रू ५ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड केली आहे. अॅप्टिव इंडिया कंपनीने अभिजीत शहाजी कदम, महेश  बाळासाहेब वने व स्वरूप देविदास गायकवाड यांची वार्षिक  पॅकेज रू ४. ५ लाखांवर नेमणुक केली आहे.

मदरसन टेक्नो टुल्स या कंपनीने तेजस संतोष आहेर, निकिता अरूण आहेर, कुणाल प्रकाश  सोळसे व नितिन मारूती शिंदे  यांची वार्षिक  पॅकेज रू ३. ६ लाखांवर निवड केली आहे. कनेक्टवेल इंडस्ट्रिज कंपनीने प्रेमानंद विनायक गडाख, मनोज सोमनाथ चव्हाण, गौरव पदमसिंग परदेशी, अजय केशव निर्भवणे, आदित्य कैलास देवकर, वैभव संतोष  कदम व स्वप्निल अशोक  गडदे यांची वार्षिक पॅकेज रू ३ लाखांवर निवड केली आहे.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त आहे. यामुळे उद्योगांना अभिप्रेत असलेला आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अभ्यासक्रमाचा समावेश  करणे कॉलेजला शक्य झाले आहे. वेगवेगळ्या  नामांकित कंपन्यांनाही आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त अभियंते लागतात. याचा परीणाम मोठ्या प्रमाणात विध्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच आकर्षक  पगारावर नोकऱ्या  मिळत असुन सर्वसामान्य कुटूंबातील मुल-मुली कुटूंबाचा आधार बनुन आई वडीलांनी पाहीलेले स्वप्न पुर्णत्वास नेत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

                     संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम तिडके आणि विभाग प्रमुखांचेही कौतुक केले आहे.