कल्पेश भागवत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : येथील आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कल्पेश चंद्रकांत भागवत यांना शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा  २०२४ या वर्षाचा राज्यस्तरीय “सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, दिपक चामे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी (दि २४ ) नाशिक येथे त्यांना तो प्रदान करण्यात आला.   

यावेळी प्रा.लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, बापूसाहेब डमरे,  हरीश खरड, पांडुरंग व्यवहारे, मुक्ता बारगजे, रागिनी लबडे, हेमलता भागवत, विहंग भागवत, रवींद्र गायकवाड, वेरोनिका गायकवाड  उपस्थित होत्या. भागवत यांनी गेल्या दशकात क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असून त्यांचे अनेक खेळाडू तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून यशस्वी नेतृत्व करत आहेत.