कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील कोकमठाण येथील ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोपरगाव पंचायत समिती आणि विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयातील उपशिक्षक वसंत जाधव यांनी पर्यावरण एक गंभीर समस्या व उपाय या शिक्षक माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, विज्ञान अध्यापक संघटना अध्यक्ष एस. डी. सातव, गणित अध्यापक संघटना अध्यक्ष वाय. डी.कदम यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते. वसंत जाधव यांचे विद्यालयातील मुख्याध्यापक छबूराव पाळंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.