कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कुस्ती आखाड्याचा उपक्रम स्तुत्य – खासदार डॉ. विखे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ :  माझी वसुंधरा अभियानान्तर्गत प्रथम राज्य पुरस्कार विजेत्या तालुक्यातील वाघोलीची वाटचाल ग्रामविकासातून समृद्धीकडे सुरू आहे. महाराष्ट्राची ओळख असलेल्या कुस्तीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी वाघोलीचा कुस्ती आखाड्याचा उपक्रम देखील स्तुत्य असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विख यांनी केले.

    वाघोलीचे ग्रामदैवत वाघेश्वरी देवी व जोडीच्या हनुमान यात्रेनिमीत्त आयोजीत कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार डॉ.विखे बोलत होते. यावेळी आमदार  मोनिकाताई राजळे, सरपंच सुश्मिता भालसिंग, उमेश भालसिंग, बापु पाटेकर, विजय देशमुख, विजय कापरे, अनंता उकिर्डे, महेश बडे, बाळासाहेब देशमुख, महेंद्र शिंदे, सुभाष बरबडे, संदिप खरड, मुसाभाई शेख आदी उपस्थित होते.

  आमदार राजळे यांनी, वाघोलीमध्ये कृषी,जलस्त्रोत व नैसर्गिक पर्यावरण संवर्धनासाठी सामुदायिक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानातून वाघोलीची ओळख राज्यस्तरावर पोहचली आहे. येथील तरुणांसाठी पोलीस व सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व कुस्ती स्पर्धा आयोजीत केली जाते. हे काम विशेष कौतुकास्पद आहे.

  यावेळी राज्यभरातून आलेल्या नामवंत मल्लांच्या २०हून अधिक कुस्त्या झाल्या. त्यामधील  प्रकाश कारखीले,तेजस ढवळे, अशोक फुलमाळी यासह विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे देण्यात आली.यावेळी अतुल मोरे, सचिन येवले, ऋषी झांजे,अनिल लोणारे, बाबासाहेब रानगे, नागेश शिंदे ,विजय डोंगरे, सागर कोल्हे,मनोज फुले आदी मल्ल उपस्थित होते.

      या कुस्तीस्पर्धेचे दगडू बोरुडे, राजेंद्र जमधडे, रावसाहेब शिंगटे, गोरक्ष दातीर, कार्लस अल्हाट, घनशाम वांढेकर, मोहन गवळी, सुखदेव शेळके, पांडूरंग भालसिंग व यात्रा कमिटीने नियोजन केले. पंच म्हणून संजय गायकवाड, संभाजी निकाळजे यांनी काम पाहीले. उमेश भालसिंग यांनी प्रास्तविक केले. माजी सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी आभार मानले.