खेळ आणि सकस आहार, उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली – माणिक आहेर

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : शालेय जीवन विद्यार्थ्यांचे आगामी सुंदर जीवन घडवित असते. हे वय अभ्यासाचे, खेळण्याचे असते. मात्र, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून खेळाबरोबरच उत्तम आणि सकस आहार घ्यावा, हीच उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिर्डी येथिल विभागीय प्रांत अधिकारी माणिक आहेर यांनी केले.

Mypage

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवा निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभात आहेर प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी प्राचार्या सुधा सुब्रमण्यम, पिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, हेडमिस्ट्रेस माला मोरे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

tml> Mypage

आहेर पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था स्थापन केल्याने विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सर्व गुण संपन्न शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी कौतुक केले. शाळेत विविध उपक्रम राबविण्याच्या हेतुने इंद्रपस्थ, नालंदा, तक्षिला व विक्रमशीला असे विभाग केले आहेत.

Mypage

या चार विभागातील विद्यार्थ्यांनी धावणे, गोळा फेक, भाला फेक, क्रिकेट, रस्सी खेच, थाळी फेक, फ्रीस बी, रीले रेस, डॉज बॉल अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. प्रमुख पाहुणे माणिक आहेर यांच्या हस्ते प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वीतिय व तृतिय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य पदकांनी गौरविण्यात आले तसेच प्रमाणपत्र ही देण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता.

Mypage

सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक विरूपक्ष रेड्डी यांच्या सह इतर शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनीही सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Mypage