शहर टाकळीत ५लाख १३ हजाराची गावठी दारू, रसायन जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३  : तालुक्यातील शहरटाकळी गावात चालत असलेल्या विनापरवाना बेकायदा हातभट्टी दारु व्यवसायावर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिसांनी आज शुक्रवारी (दि.३ ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास छापे मारून ८ जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील तयार हातभट्टी दारु व ती तयार करण्याचे कच्चे रसायन असा एकूण ५ लाख १३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक पुजारी यांना या संदर्भात माहिती मिळाली असता त्यांनी त्यासाठी तीन पथके तयार करून एकाच वेळी छापे टाकून कारवाई फत्ते केली.

      शेवगाव पोलिस ठाण्यात संबधित आरोपीवर विविध कालमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून  वरिष्ठाच्या  मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह सपोनि.रविंद्र बागुल, सपोनि. विश्वास पावरा, सपोनि आशिष शेळके, पोहेकॉ.परशुराम नाकाडे, पोना.अभवसिह लबडे, पोना.रविंद्र शेळके , पोकॉ.किशोर शिरसाठ, पोकॉ.राजु ढाकणे पोकॉ.महेश सांवत, पो कॉ.बप्पासाहेब धाकतोडे, म.पो.ना. सुरेखा गायकवाड, पोहेकॉ. मन्याळ यांच्या पथकाने केली आहे.