पवार साहेब पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहमारे, व्हा.चेअरमनपदी चौधरी

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी देवेन गोरखनाथ रोहमारे तर व्हा.चेअरमनपदी रावसाहेब शंकरराव चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Mypage

   पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांपूर्वी बिनविरोध झाली असून नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड नुकतीच संस्थचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी ए.आर.रहाणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक अनिल महाले, महेंद्र काळे, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, बन्सी निकम, सौ.परवीन तालिब सय्यद, सौ. मेघा चंद्रशेखर कडवे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर उपस्थित होते.

tml> Mypage

         यावेळी चेअरमनपदाच्या नावाची सूचना सुदाम वाबळे यांनी मांडली त्या सूचनेस महेंद्र काळे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदाच्या नावाची सूचना बन्सी निकम यांनी मांडली त्या सूचनेस व्यंकटेश बारहाते यांनी अनुमोदन दिले. यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने चेअरमनपदी देवेन रोहमारे व व्हा. चेअरमनपदी रावसाहेब चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी जाहीर केले.

Mypage

निवडणुककामी पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित चेअरमन देवेन रोहमारे व व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी यांचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सर्व संचालक मंडळाने देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Mypage

           यावेळी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल देवेन रोहमारे म्हणाले की,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी संस्था स्थापन करून या संस्था आर्थिक शिस्तीत चालविण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्याच आदर्श वस्तुपाठावर आज उद्योग समूह प्रगतीच्या शिखराकडे वेगाने झेपावत आहे.

Mypage

या उद्योग समुहातील प्रगतीपथावर असलेल्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड करून मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली आहे. हि दिलेली जबाबदारी माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे पार पाडून संस्थेला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर घेवून जाण्यासाठी संस्थेचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Mypage