योजनांचा लाभ घेऊन दिव्यांगांनी स्वयंपूर्ण व्हावे – मुख्याधिकारी राऊत

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : दिव्यागांसाठी  राज्य व केंद्र सरकारच्या विविध लाभदायी योजना आहेत. त्यांचा दिव्यांगांनी लाभ घेवून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राउत यांनी केले.

Mypage

शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून शेवगाव नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी राखून ठेवलेल्या निधीचे शहरातील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. त्याची माहिती संबधितांना देण्यासाठी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्याधिकारी राउत बोलत होते.

Mypage

      यावेळी राऊत यांनी शहरातील नगरपरिषदेकडे नोंदणी असलेल्या १६२ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी रुपये १०५५ प्रमाणे १ लाख ७० हजार ९१० रुपये रक्कम संबधीतांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती  दिली.

Mypage

लेखापाल सोमनाथ नारळकर यांनी स्वागत व प्रास्तविक करून योजनेची माहिती दिली.  पाणी पुरवठा विभागाचे शरद लांडे यांच्यासह प्रहार दिव्यांग संघटनेचे गणेश हनवते, किशोर गरंडवाल, पांडुरंग काथवटे, शरद केरकड, लक्ष्मण शिंदे, सोहेल पठाण, अफजल पठाण, सौरभ शिंदे, बाळासाहेब सरोदे यांच्यासह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *