राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्संत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे  व्यावस्थापकीय संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात कोपरगाव शहरातून फार्मसिस्ट डे निमित्ताने आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली.

यात विद्यार्थ्यांनी घोषणा देत कोपरगावात फिरून आरोग्य चांगले कसे ठेवावे हे समजावून सांगितले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे देणे लागतो. या उद्देशाने फार्मसिस्ट वीक मध्ये फार्मसिस्ट डे च्या निमित्ताने एक हात मदतीचा, डोनेट ब्लड अँड सेव्ह लाईफ,’ म्हणून रक्तदान शिबीर आयोजित केले.कोपरगाव येथील संजीवनी ब्लड बँकेच्या मदतीने हे रक्तदान शिबीर पार पडले.

यात 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात त्यामध्ये सर्व फार्मसी, नर्सिंग, होमिओपॅथिक, फिजिओथेरपी आणि आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीचे प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनी रक्तदानाचे महत्व पटावुन सांगितले यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या चेअरमन नीता पाटील, डॉ.सोनिया रणदिवे, सौ. बेबीताई कातकडे, कडू सर, फार्मसीचे प्राचार्य डॉ.नितीन जैन, सिव्हिल इंजिनीअर दीपक कोटमे, प्रा.उषा जैन, प्रा.धनश्री बोरावके, प्रा.सोनिया देशमुख, योगिता गायकवाड तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.