पावसाचा झाला कहर, राञभर पाण्यात कोपरगाव शहर 

गोदावरी नदी शांत, पण खंदक नाल्याला पूर 

 कोपरगाव प्रतिनिधी दि.२०: कोपरगाव शहरासह तालुक्यात राञभर मुसळधार पाऊस पडल्याने कोपरगाव जलमय झाले. शहरातील खडकी येथील शेकडो नागरीकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांना राञ जागुन काढावी लागली तर  गोकुळनगरी, बैलबाजार रोड परिसर संजयनगर, कर्मवीवीर नगर, शंकरनगर, गवारेनगर आदी भागातील नागरी वस्तीत पाणी घुसल्याने नागरीकांची बेहाल झाली.

खंदक नाल्याला प्रमाणापेक्षा अधिक पाणी आल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत झाली होती तर नागरीकांनी आपली वाहने पाण्यातून काढत मार्गस्थ होत होते.

दरम्यान तालुक्यातील चांदेकसारे, आनंदवाडी या भागातील ओढ्याचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पहाटे पासुन तालुक्याची प्रशासकीय यंञणा बचाव व मदत कार्यात सक्रीय झाली आहे. तर राञी उशिरापासुन  आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या यंञणा मदतीसाठी धावत आहेत.

शहरातील बाजार तळ भागात विज पडल्याने एक गाय व कुञ्याचा मृत्यु झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने भरलेले साहित्त्य, नविन कपडे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. अनेकांच्या कोंबड्या, शेळ्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. 

 गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असली तरी ती शांत वाहते. माञ शहरतील खंदक नाल्याला पूर आल्याने शहरातील अनेक उपनगरे पाण्यात बुडाले. कोपरगाव तालुक्यात राञभर मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण तालुका दिवाळीच्या तोंडावर संकटात सापडला आहे. पावसाच्या पाण्यात आडकलेल्यांना तालुक्याच्या दोन्ही नेत्यांमार्फत मदत कार्य सुरु आहे. 

 शहरातील खडकी भागात राहणाऱ्या शेकडो कुटूंबानी पूर्ण राञ पाण्यात जागुन काढली. डोळ्यादेखत घरातल्या वस्तू वाहून जात होत्या माञ पोटच्या मुलांना उंचावर घट्ट पकडून अनेकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने कोणतीही  जीवत हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.