कोपरगावची पूररेषा खंदक नाल्यामुळेच वाढल्याचे पावसाने सिध्द केले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २०: गोदावरी नदीच्या पूराच्या पाण्यामुळे फार कमी प्रमाणात कोपरगाव शहरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरते नदीकाठी वसलेला काही ठराविक भाग वगळला तर शहराला महापूराची स्थिती शक्यतो निर्माण होत नाही माञ शहराचा सर्वात मोठा खंदक नाला महापूराला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होते.

त्यामुळे प्रशासनाने शहराची पूररेषा नदीच्या पाण्या ऐवजी नाल्याच्या पाण्यावरुन निश्चित केली आहे ही पूररस्थिती मानवनिर्मित आहे. खंदक नाल्याची रुंदी, खोली दिवसेंदिवस कमी होत गेली. काही ठिकाणी नाला लुप्त झाला त्यामुळे वरच्या भागा तील पावसाच्या पाण्याचा प्रवाह नदी पाञापर्यंत जात नसल्याने ते पाणी शहरातील उपनगरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरात घुसते.

पाटबंधारे विभागाने अंदाजे व पाणी गेलेल्या भागातील नागरीकांच्या सांगण्यावरून स्थानिक प्रशासनाने चिन्हांकित केल्याने पूर रेषा निश्चित करणे चुकीचे आहे त्यामुळे निम्मे कोपरगाव पूररेषेत ओढून विकास कामाला आडकाठी आणले जात आहे. गेल्या १४ वर्षापासुन शहराच्या अनेक योजना पूररेषेतील नागरी वस्तीत अपेक्षीत प्रमाणात राबवता आल्या नाही. मालमत्ताधारकांना शासकीय नियमावलीचा सामना करावा लागला.

कोपरगाव शहराची पूररेषा चूकीची आहे यावर लोकसंवाद ने अभ्यासपूर्वक विश्लेषण केले. त्या विश्लेषणाला निसर्गाने सहमती दिल्यासारखे गुरुवारी पहाटे गोदावरी नदीला पूर नसतानाही केवळ खंदक नाल्याला आलेल्या पाण्यामुळे शहरातील अचानक उपनगरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. लोकसंवादच्या वृत्तमालीकेचे अनेकांनी कौतूक करुन प्रभातच्या नि:पक्ष लिखानाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. किमान आतातरी प्रशासनाने कोपरगाव शहराची जूनी पूररेषा पुसुन नवीन सुधारीत पूररेषा करावी अशी चर्चा आज दिवसभर सुरु होती.

नैसर्गिक गोदावरी नदीच्या पाण्यामुळे महापूर जरी येत असला तरी शहरातील कोणत्या भागात येतो आणि केवळ खंदक नाल्यामुळे कोणत्या भागात पूर येतो हे लोकसंवाद ने व आजच्या पावसाने सिध्द करून दाखवले.

सुदैवाने गुरूवारी गोदावरी नदीला नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून केवळ १७ हजार ५४५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होता. तालुक्यात चार तास मुळधार पाऊस झाला. सर्व रस्ते ओढे नाले तुडुंब भरुन वाहत असतानाही गोदावरी नदीपाञाचे पाणी पूररस्थिजन्य नव्हते माञ खंदक नालल्याचे रौद्ररूप झाल्याने शहरात आज पूरस्थिती निर्माण झाली. शहराला जोडणारे रस्ते पाण्याखाली होते. यात पूर रेषा नदीची ग्राह्य धरायची की नाल्याची. शहराला धोक्यात टाकणाऱ्या खंदकनाल्या बाबत प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची गरज आहे. जखम शेंडील आणि मलम मांडीला हि अवस्था कोपरगावच्या पूररेषे बाबतीत झाली आहे.