कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : ‘खाजगीकरण, ऊदारीकरण आणि जागतीकीकरण (खाऊजा) या धोरणांमुळे तसेच तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेमुळे जग कवेत आले आहे. आत्तापर्यंत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील माजी विध्यार्थ्यांनी जसे वेगवेगळे किर्तीमान स्थापित करून देश परदेशात आपले आस्तित्व निर्माण केले, तसे संजीवनी आर्टस, काॅमर्स आणि सायन्स महाविद्यालयातील पारंपारीक शिक्षण घेणाऱ्या ग्रामिण विध्यार्थ्यांनी सुध्दा देश परदेशात आपल्या ज्ञानाच्या आणि अंगीभुत कौशल्यांच्या जोरावर कर्तृत्व सिध्द करावे’, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, काॅमर्स व सायन्स काॅलेज काॅलेजच्या वतीने नुकताच ‘रिसेन्ट रिसर्च ट्रेंड्स इन ऑरगॅनिक क केमिस्ट्री करीअर ऑपॉर्च्युनिटीज अँड फ्युचर पर्सपेक्टिव्हज्’ या विषयावर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीसंवाद आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. समाधान दहिकर व परीसंवादाचे समन्वयक प्रा. योगेश गाढवे उपस्थित होते. तसेच शास्त्र विषयाचा अभ्यास घेणारे विध्यार्थी मोठ्याा संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डाॅ. दहिकर यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करून परीसंवादाचे महत्व व हेतु स्पष्ट केला.
सुमित कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या विध्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करून युनायटेड स्टेटस्, इस्त्राएल व बेंगलोर येथिल आंतरराष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक या परीसंवादासाठी आमंत्रिकत करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा घ्यावा. अनेक भारतीय परदेशात जावुन आपले वेगळेपण सिध्द करतात, अशांकडे आपले आयडाॅल म्हणुन बघावे. ज्या व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळे आस्तित्व निर्माण करतात, त्यांचे गुण अंगीकरणाचे प्रगत्न करा, यश निश्चित मिळेल.
दिवसभरच्या या परीसंवादामध्ये इस्त्राएल येथिल बेन गुरीयन विद्यापीठाचे पोस्ट डाॅक्टरल रिसर्चर डाॅ. यशवंत पंडीत यांनी पाॅलीमर केमेस्ट्री अँड करीअर ऑपॉर्च्युनिटीज या विषयावर, युनायटेड स्टेटस् मधिल टेक्सास येथिल सिंथेटीक अँड मेडीसिनल केमिस्ट्रीचे तज्ञ डाॅ. सचिन वाघ व बेंगलोर येथिल जैन विद्यापीठातील डाॅ. रमेश दातीर यांनी कॅटॅलिस्ट इन बायोकेमिकल प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. प्रा. लीना मंटाला यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.