राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्काराने वर्षा सुडके यांचा गौरव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ वर्षा नवनाथ सुडके यांना
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुणे येथील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे दरवर्षी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय  गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ या उपक्रमांतर्गत आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार २०२२ ‘ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

         सन २०१७ ला स्थापन झालेल्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूलने अल्पावधीत मोठी प्रगती साधली. मुख्याध्यापिका सौ सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने करोना कालावधीत देखील उत्कृष्ट योगदान दिले. विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध ठिकाणी  वृक्षारोपण करुन पंचक्रोशीतील नागरिकांचे पर्यावरण संवर्धनाबाबत उद्बोधन केले? आदि बाबी पुरस्काराच्या निवडीसाठी विचारात घेण्यात आल्या आहेत.

      पुण्यातील डेक्कन जिमखाण्याच्या सांस्कृतिक सभागृहात सौ. मनीषा कदम यांचे अध्यक्षतेखाली परिषदेचे समन्वयक प्रकाश सावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत  या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, आणि महावस्त्र  असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे संस्थापक नवनाथ उमाजी सुडके,  अध्यक्ष अंकुश सुडके, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मेधा कांबळे, वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. के के गलांडे, गजेंद्र डाके यांचे सह अनेकांनी सौ सुडके यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.