छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतिनिधी दि .१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने रविवार दि. १९/०२/२०२३ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, सफाई मित्र, शिक्षक व आशा स्वयंसेविका अशा एकूण २१ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक, पूजन, आरती विधीवत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमा प्रसंगी पहाटे वातावरण शिवमय झालेले होते. नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नगरपरिषदेच्या माध्यमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक, शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती. याकरिता विद्युत अभियंता रोहित सोनवणे व त्यांच्या टिमने विशेष परिश्रम घेतले.

तसेच आरोग्य निरीक्षक सुनील आरण, एम.के.आढाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई, मारुती काटे व निलेश बुचकुले यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.