जगात अशक्य असे काही नाही – गणेश शिंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : उरासी उच्च ध्येय बाळगा, आपल्यातील आत्मविश्वास जागवून मार्ग क्रमण करा. जगात अशक्य असे काही नाही. असा सल्ला प्रबोधनकार वक्ते गणेश शिंदे यांनी युवक वर्गाला दिला आहे. आव्हाणे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या निम्मिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी ‘जीवन सुंदर आहे ‘ या विषयावर गणेश शिंदे  बोलत होते.

यावेळी सभापती डॉ क्षितिज  घुले पाटील , सरपंच संगिताताई कोळगे,पंचायत समिती सदस्य मनिषाताई कोळगे,अनिता तागड, शोभाताई पठाडे,वंसतदेवा भालेराव,बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, सुभाषराव वाणी, सुधाकर चोथे, मोहनराव कोळगे, नानासाहेब खैरे, सुभाष दिखे,शिवाजी तळेकर, राहुल गोर्डे, यासह मोठ्या संख्येन महिलावर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

  शिंदे यांनी हागणदारीमुक्त गाव, व्यसनमुक्ती,स्त्री भ्रूण हत्या,अंधश्रद्धा,जुन्या रूढी परंपरा,बचत गटाच्या माध्यमातुन संघटन  अशा विविध  विषयांस स्पर्ष करत मुलां मुलीमध्ये भेदाभेद करु नका. मुलींना देखील उच्च शिक्षण द्या.  मोबाईलचा अनावश्यक उपयोग टाळा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नात्यात सुसंवाद ठेवा असे अवाहन शेवटी केले.     

सभापती डॉ . घुले पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, भाग्यश्री दिक्षित, अंबादास दिवटे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. याकार्यक्रमाप्रसंगी आव्हाणे बु.गावात उल्लेखनीय कार्य केलेल्या साईनाथ झाडे,शंकर नांगरे,बाबासाहेब चोथे,शाहाजी दिंडे,योगेश पंडित, अनिल जाधव,पांडुरंग रसाळ,बापुराव पवार,परसराम मुटकुळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.