कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९९७-९८ सालच्या ‘अ’ आणि ‘ड’ तुकडीत शिकणा-या माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमीत्त एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला देवुन एक हात मदतीचा माध्यमांतुन आपल्याच अडचणींत असलेल्या वर्गमित्राला ६१ हजार रूपयांची मदत केली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लहानपणापासुन एकत्रीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेवून नोकरी व्यवसायानिमीत्त बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांतून सोमनाथ परजणे यांनी दिवाळीनिमीत्त एकत्र केले व त्यांचे स्नेहसंमेलन घेतले. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगांव येथे इयत्ता दहावीमध्ये १९९७-९८ मध्ये अ आणि ड तुकडीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी आपल्या ख्याली खुशालीची एकमेकांना माहिती दिली.
कोणी डॉक्टर, वकील, मेजर, नोकरदार, व्यावसायिक झाले. त्यात माजी विद्यार्थी रहिम शेख यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती समोर आली त्यावर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक हात मदतीचा ग्रुप स्थापन करत स्नेहसंमेलनात काही कामानिमीत्त उपस्थित राहु न शकलेल्या सहकारी मित्रांना याची कल्पना दिली. यासर्व माजी विद्यार्थ्यांनी आपलाच सहकारी अडचणीत आहे त्याला मदत केली पाहिजे ही भावना कायम ठेवत त्या माध्यमातुन सुमारे ६१ हजार रूपयांचे आर्थीक सहकार्य मित्र रहिम शेख यांना केली त्यावर रहिम शेख अत्यंत भावूक झाले.
मित्राचे आभार कसे मानावे याबददल त्यांना शब्दही फुटेना, ते गहिवरून आले, अडचणीत मित्रांनी मित्राला केलेली मदत यात कमालीचा आपूलकीचा गोडवा होता. या सर्व माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या मित्राला मदत केल्याचे समाधान झाले. माजी विद्यार्थी गोरख चव्हाण यांनी उपस्थितांना दिवाळसणाची गोड मेजवानी दिली. शेवटी सागर शहा यांनी आभार मानले.