कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा रविवारी गळीत हंगाम शुभारंभ

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि.२९ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक रमेश रंगनाथ आभाळे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. निलम रमेश आभाळे या उभयतांच्या शुभहस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

Mypage

यावेळी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व कारखान्यांचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होत असल्याची माहिती उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली.

Mypage

तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या गळीत हंगाम शुभारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.

Mypage