माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, ऋषीकेश ढाकणे करोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित

शेवगIव प्रतिनिधी, दि. २९ : येथील शाहू, फुले, आंबेडकर साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या वतीने माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषीकेश ढाकणे यांना करोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

      यावेळी संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट ,जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभावती ढाकणे राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे , नगरसेवक बंडू बोरुडे, खरेदी विक्री संख्याचे संचालक विकास घोरतळे,माजी सरपंच रामजी अंधारे, भाऊराव भोंगळे, भगवान मिसाळ, शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाचे अध्यक्ष अशोक शिंदे, वसीम  मुजावर,  पोषाण्णा कडमिंचे, बाबा बेलापूरकर, राहुल कांबळे,दत्तू मिसाळ यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.

टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  करोना महामारी परिस्थिती चांगल्या प्रकारे  हाताळली. स्वताची आई मृत्यूच्या दारात  असताना देखील त्यांनी मातृभुमीच्या सेवेला प्राधान्य  दिले. तर ढाकणे यांनी देखील करोना  काळात शेवगाव आणि पाथर्डी येथे दोन कोविड सेंटर सुरू करून अनेक रोग्यांचा  जीव वाचविला आहे. शाहू फुले आंबेडकर मंचने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दोघांना करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले.