खिलाडूवृत्ती यशस्वी जीवन जगण्यास शिकविते  – पोलीस निरीक्षक देसले

 संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये बास्केटबाॅल व व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे उद्घाटन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : प्रत्येक क्रीडा प्रकारातुन खेळाडूची जिध्द आणि चिकाटी विकसीत होते, भविष्यात कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्यासाठी सामर्त्य सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता खेळांमधुनच विकसीत होते. खेळामधुन संघभावना निर्माण झाल्याने खेळाडू आपापल्या संघाला यशाकडे तर घेवुुन जातातच, परंतु हा पैलु भविष्यात संघटन करण्यास फार उपयोगी पडतो. एकुणच खिलाडूवृत्ती यशस्वी जीवन जगण्यास शिकविते, असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

इंटर इंजिनीअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत, ई १ झोन अंतर्गत, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत संजीवनी पाॅलीटेक्निकच्या भव्य मैदानावर ई झोन अंतर्गत विविध पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधिल मुलांच्या बास्केटबाॅल व व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्री देसले खेळाडूंसमोर बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, विविध संस्थांमधुन आलेल्या संघांचे प्रतिनिधी, संजीवनील र्व विभागांचे विभाग प्रमुख, डीन्स, पंच व क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

देसले पुढे म्हणाले की, खेळाडू आजारी पडत नाही. त्याची शारीरिक तंदुरूस्ती राहुन मन प्रसन्न राहते आणि खेळाडू नेहमीच नैराश्येपासुन दुर राहतो, ही फार महत्वपुर्ण बाब आहे. तरूण वयात आवश्यक यश प्राप्त न झाल्यास तसेच संसार प्रपंच करीत असतानाही अनेकांना नैराश्य जडते. परंतु खेळाडूला यापासुन दुर राहण्याचे वरदान खेळातुन मिळते. प्रत्येक खेळाडू जिकण्यासाठी खेळतो, तुम्ही आपल्या काॅलेजसाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी व देशासाठी खेळा, असे सांगुन देसले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कोल्हे म्हणाले की संजीवनी पाॅलीटेक्निक हे शैक्षणिक गुणवत्तेत तर आघाडीवर असतेच, परंतु विध्यार्थ्यांच्या  जीवनात खेळही असावा म्हणुन जाणिवपुर्वक प्रयत्न करण्यात येतात अणि त्यातही संजीवनी आघाडीवर असते, हे अनेक स्पर्धांच्या यशातुन सिध्द झाले आहे. येथिल विध्यार्थ्यांना प्रत्येक खेळाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले प्रशिक्षक  नेमले आहेत. यामुळे येथिल खेळाडूंची देश पातळीवरील स्पर्धांसाठी विविध संघांमध्ये निवड होत असल्याचे दिसुन येत आहे.

प्रा. मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्तविक भाषणातुन संजीवनी पाॅलीटेक्निकची क्रीडा क्षेत्रातील कामगीरी सांगीतली. तसेच संजीवनी पाॅलीटेक्निकने २०१९-२०  ला आयईडीएसएसएच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेवुन संपुर्ण राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविल्याचे अधोरेखित केले. प्रा. आय. के. सय्यद यांनी सुत्र संचलन करून आभार मानले.