शेवगावत अंदाजे ३०० किलो गोमांस जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने शुक्रवारी सकाळी साडेसातला येथील खाटीक गल्लीतील दुकानांवर छापा टाकून केलेल्या कारवाईत अंदाजे ३०० किलो गोमांस व तराजू, चाकू व लाकडी ओंडका आदि साहित्य मिळून एकूण ६० हजार २०० रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला.

यावेळी केलेल्या कारवाईत आरोपी नामे अनवर महंमद कुरेशी (वय ६०), जुनेद हारून कुरेशी (वय ३२), मुजाहिद नूर मोहम्मद कुरेशी (वय ३०) व रईस अब्बास सौदागर (वय ४७) सर्व रा. खाटिक गल्ली शेवगाव, तालुका शेवगाव हे महाराष्ट्र राज्यांत गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असतानाही गोवंशी जातीचे जनावराची कत्तल करताना आढळून आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ.शिवाजी अशोक ढाकणे (वय३२) यांनी ही फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोनी सुधाकर दराडे करीत आहेत. 

जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशनुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत शेवगावातील खाटीक गल्लीत तसेच परवा तालुक्यातील बोधेगाव येथे देखील या स्वरूपाची कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.